आठवलेंना उमेदवारी नाकारली तर बंड करू; आरपीआय पदाधिकाऱ्यांचा इशारा

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षातूनच राजीनामा सत्र सुरू झाल्याने मिंध्यांच्या डोक्याला आधीच शॉट बसला आहे. त्यात पेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उमेदवारीसाठी हट्ट धरला आहे. आठवले यांना उमेदवारी नाकारल्यास बंड करू, असा इशारा आरपीआय पदाधिकाऱयांनी दिल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

महायुतीच्या प्रमुख पक्षांत लोकसभेच्या जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यातच शिर्डीतून आठवले यांना उमेदवारी मिळावी यासाठी आरपीआयच्या पदाधिकाऱयांनी महायुतीच्या नेत्यांवर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. शिर्डीतून आठवलेंना उमेदवारी दिली नाही तर महायुतीच्या विरोधात नगर आणी शिर्डीत अपक्ष उमेदवार उभे करण्याचा इशारा आरपीआयचे उपाध्यक्ष विजय वाप्चौरे यांनी दिला आहे.

सोलापूर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेची मागणी रामदास आठवले यांच्या गटाकडून केली जात आह, मात्र भाजप नेते गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. भाजपने आम्हाला जागा दिल्या नाही तर निश्चिपणे त्याचा तोटा त्यांना होईल. समाजाला आठवले यांना शिर्डीचे खासदार म्हणून पाहायचे आहे. अन्यथा आम्हाला बंड करावे लागेल, असे वाप्चौरे यांनी म्हटले आहे.