हिंदुस्थान-पाकिस्तान भिडणार, ‘या’ दिवशी रंगणार सामना

Womens Asia Cup 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. श्रीलंकेमध्ये 19 ते 28 जुलै दरम्यान महिला आशिया चषकाचे सामने पार पडणार आहेत. यात हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये 21 जुलै रोजी लढत होईल.

एशियन क्रिकेट काउंन्सिल (ACC) ने 26 मार्च (मंगळवार) रोजी महिलांच्या आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले. क्रिकेट म्हटल की हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी आतूर असतात. 21 जुलै 2024 रोजी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान ही लढत रंगणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये विजेतेपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

स्पर्धेत एकूण 8 संघ विजेतेपदासाठी आपआपसात लढतील. ग्रुप-ए मध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, नेपाळ आणि युएई यांचा समावेश आहे. ग्रुप-बी मध्ये मलेशिया, श्रीलंका, बांग्लादेश आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. श्रीलंकाच्या दांबुलामध्ये सर्व सामने पार पडणार आहेत. टीम इंडीयाचा पहिला सामना 19 जुलै रोजी युएई विरुद्ध होईल. यावर्षी सुद्दा आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. हिंदुस्थानचा संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडीयने आतापर्यंत 7 वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. <

/p>