राज्यात सरासरीच्या 104 टक्के पाऊस; 85 टक्के पेरण्या पूर्ण

राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला आहे. 178 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्क्यांपेक्षा जास्त, 130 तालुक्यात 75 ते 100 टक्के आणि 58 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे.

राज्यात 120 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या 85 टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची 111 टक्के आणि कापसाची 96 टक्के झाली आहे. जास्त पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.