‘एआय’मुळे 40 टक्के नोकऱ्या धोक्यात

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे आगामी काळात नोकऱ्यांकर गडांतर येणार असून जगभरातील जवळपास 40 टक्के नोकऱ्यांना एआयमुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (आयएमएफ)च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिका यांनी व्यक्त केली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू होणाऱ्या आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यापूर्वी जॉर्जिया यांनी ही भीती क्यक्त केली आहे. एआयमुळे विकसित देशांमधील 60 टक्के नोकऱ्या धोक्यात येतील. हे नोकरीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही धोकादायक ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादकता वाढविण्याच्या संधी निर्माण करेल. त्यामुळे एआय निश्चितच धोकादायक आहे पण ते सर्वांना संधी देईल, असेही त्या म्हणाल्या. नकीन आयएमएफचा अहवालाचा हवाला देत त्या म्हणाल्या की, जागतिक स्तरांवर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर एआयचा परिणाम होऊ शकतो. 2024 हे जगभरातील अर्थव्यवस्थेसाठी कठीण वर्ष असू शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.