जपानी कंपनीतील कामगारांना 8 हजारांची घसघशीत पगारवाढ! आमदार सचिन अहिर यांच्या पाठपुराव्याला यश 

अंबरनाथ येथील प्लॅस्टिक मोल्डचे (सीएनसी) उत्पादन करणाऱया .एस.बी या जपानी पंपनीतील जवळपास 154 कामगारांना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी व्यवस्थापनाशी केलेल्या कराराद्वारे भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे. या पगारवाढीचे कामगारांनी मोठय़ा जल्लोषात स्वागत केले आहे! 

नवीन पगार वाढीच्या करारामुळे प्रत्यक्षात कामगारांना मासिक आठ हजार रुपये पगारवाढ झाली असून या कराराने नवीन पगारवाढ मिळून आता कामगारांच्या कमीत कमी 25 हजार रुपयांवर महिना पगारापोटी घसघशीत रक्कम हाती पडेल. 

पगारवाढी संबंधाने युनियन नेत्यांनी व्यवस्थापनाबरोबर सविस्तर चर्चेनंतर करारावर युनियनच्या वतीने अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि उपाध्यक्ष उत्तम गीते यांनी, तर व्यवस्थापनाच्या वतीने संचालक एम.व्ही.राव यांनी स्वाक्ष्रया केल्या. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या पगारवाढीचे स्वागत केले आहे. कराराच्या वेळी संघटन सेव्रेटरी राजेश गुंजाळ, कमिटी सदस्य संतोष पवार, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.

इतर सुविधाही मिळणार

पगारवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झाली असून ती चार वर्षांसाठी आहे. मागील थकबाकीपोटी कामगारांना 14,500 रुपये पगारासोबत मिळत आहेत. नव्या कराराने पूर्वीच्या भरपगारी रजेत आणखी दोन दिवसांची तर पूर्वीच्या नैमित्तिक रजेत आणखी तीन दिवसांची भर पडली आहे. तसेच शिफ्ट अलाऊन्स आणि इन्शुरन्समध्ये 9000 रु. पर्यंत वाढ झाली आहे.