हिंदुस्थानला मोठी आघाडी; इंग्लंडला 253 धावसंख्येवर रोखले

सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या झुंजार द्विशतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या डावात 112 षटकांत 396 धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या ‘बुमरँग’ गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती पत्करल्याने इंग्लंडला 55.5 षटकांत 253 धावांवर रोखल्यामुळे हिंदुस्थानने पहिल्या डावात 143 धावांची मोठी आघाडी घेतली. मग यजमान टीम इंडियाने दुसऱया डावात उर्वरित 5 षटकांत खेळात बिनबाद 28 धावसंख्येपर्यंत मजल मारून आपली आघाडी 171 धावांपर्यंत वाढविली. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जैस्वाल 15, तर कर्णधार रोहित शर्मा 13 धावांवर खेळत होते.