क्लीन-अप मार्शल ‘जोरात’…! दोन आठवडय़ांत तीन लाखांचा दंड वसूल

मुंबईत दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या क्लीन-अप मार्शलच्या कारवाईत गेल्या दोन आठवडय़ांत 2 लाख 96 हजार 513 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेच्या एकूण 25 वॉर्डपैकी सध्या सहा वॉर्डांत ही कारवाई सुरू असून लवकरच सर्व वॉर्डमध्ये ही कारवाई केली जाणार आहे. या उपक्रमात सार्वजनिक ठिकाणी घाण, अस्वच्छता करणाऱयांकडून 200 ते एक हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जात आहे.

मुंबईत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘क्लीन–अप मार्शल’ पुरवणाऱया संस्थेच्या पंत्राटाची मुदत संपल्याने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱयांविरोधात कारवाई थांबली होती. मात्र 2 एप्रिलपासून पुन्हा ही कारवाई सुरू झाली. महापालिकेच्या आयटी विभागाने ऑनलाईन अॅपद्वारे दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्लीन–अप मार्शलकडे मोबाईल ब्ल्यूटूथवर चालणारा छोटा प्रिंटर देण्यात आला आहे. या प्रिंटरद्वारे दंडाकरिता स्वतंत्र पावती छापून दिली जात आहे. दंडाची रक्कम ही क्लीन–अप मार्शल संस्थेच्या बँक खात्यात जमा होत आहे. दंडाची अर्धी रक्कम पालिका तर अर्धी रक्कम पंत्राटदाराला मिळणार आहे.

हे करू नका, अन्यथा कारवाई

• उघडय़ावर इतरत्र कचरा टाकणे – 200 रुपये
• उघडय़ावर थुंकणे – 200 रुपये
• उघडय़ावर स्नान करणे – 100 रुपये
• दुकानाबाहेर कचऱयाचा डबा न ठेवणे – 500 रुपये
• कचरा विभक्तीकरण न करणे – 500 रुपये
• प्राणी व पक्ष्यांना उघडय़ावर खाऊ टाकणे – 500 रुपये
• धोकादायक कचरा निर्देशित न करणे – 500 रुपये

अशी झाली कारवाई
ः ए वॉर्ड पर्ह्ट
177313 रुपये
(820 चलान)

ः सी वॉर्ड मुंबई सेंट्रल
39900 रुपये
( 86 चलान)

ः ई वॉर्ड भायखळा
1500 रुपये
(24 चलान)

ः जी/एस वरळी
76400 रुपये
(258 चलान)

ः आर/सी बोरिवली
200 रुपये (2 चलान)

ः के/ई अंधेरी पूर्व
1200 रुपये (13 चलान)