दहावीचा निकाल 97 वरून 84 टक्क्यांवर

कोरोना काळानंतर झालेल्या परीक्षांमध्ये दहावीचा निकाल 97 टक्क्यांवरून थेट 84 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पालिकेने घटणारा निकाल वाढवण्यासाठी आणि पहिलीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहा कलमी गुणवत्ता सुधार कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहा पातळय़ांवर काम केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी राजेश पंकाळ यांनी दिली. 

पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा 8 भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. स्वतंत्र संगीत, कला, कार्यानुभव, स्काऊटगाईड विभाग असणारी ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. पालिका शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. शिवाय व्हर्च्युअल क्लासरूम, मोफत बेस्ट प्रवास, टॅब अशा सुविधा आहेत, मात्र गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढू लागल्याने पालिका शाळेतील विद्यार्थी टिकवणे आणि वाढवणे असे दुहेरी आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले होते. पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी केंब्रीज बोर्ड, आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, विज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास अशा प्रकारे सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामुळे आता पालिका शाळांतील विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे, तर आता निकाल वाढवण्यासाठी गुणवत्ता सुधार उपक्रम राबवण्यात येणार आहे. 

असा राबवणार उपक्रम

टक्क्यांवर गुण मिळवणाऱया विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाऱया विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग

यासाठी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार शोध 

किमान उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांवर उपक्रम

बेसिकचे धडे, वर्कशिट सोडवणे, छोटय़ा गोष्टींवर लक्ष

गुणवत्तेवर पालिका, एनजीओकडून लक्ष ठेवले जाणार

पालिकेची शैक्षणिक स्थिती

नर्सरी ते दहावीपर्यंतच्या एकूण शाळा – 1150

शाळांच्या एकूण इमारती – 450

सध्याची विद्यार्थी संख्याचार लाखांवर