साताऱयातील 723 खासगी बसेसवर कारवाई, ‘परिवहन’च्या वायुवेग पथकाची विशेष मोहीम

प्रातिनिधिक फोटो

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुकेग पथकामार्फत सातारा जिह्यातील विविध ठिकाणी दि. 15 ते 30 जून या कालावधीत खासगी बस तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 334 खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यात 723 बसेसवर कारवाई करत 25 लाख 76 हजारांचा दंड वसूल केला.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून सातारा जिह्याच्या राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गावरून अनेक बस धावत असल्याच्या तक्रारी सातारा आरटीओ विभागाकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओकडून जिह्यात खासगी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयाने मे 2023 मध्ये 1 हजार 845 खासगी बसेसची जिह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्गावर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे 560 खासगी बसेस दोषी आढळून आल्या. दोषी बसकडून 9 लाख 49 हजार रुपयांचा दंड कसूल करण्यात आला. जून 2023 मध्ये 489 बसची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 163 बस दोषी आढळून आल्या. दोषी बसचालकांकडून 16 लाख 27 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती विनोद चव्हाण यांनी दिली.

या गोष्टी पाहून कारवाई

बसतपासणी मोहिमेत कर थकीत वाहने, विनापरवाना अथवा परवाना अटीचा भंग करून बस चालवणे, बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक करणे, योग्य प्रमाणपत्र वैधता संपणे, बसमधील अवैध बदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, जादा भाडे आकारणी, अग्निशमन यंत्रणा तसेच आपत्कालीन दरवाजा या गोष्टी पाहून कारवाई करण्यात आली.