16 हजार फुटांवर अचानक विमानाचा दरवाजा तुटला, प्रवासी-क्रू मेंबरमध्ये घबराट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम

अमेरिकेत एक मोठी दुर्घटना टळली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या बोइंग विमानाचा अचानक दरवाजा तुटला आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. टेक ऑफ केल्यानंतर आकाशात सुमारे 16 हजार फूट उंचीवरुन ही घटना घडली. त्यामुळे विमानातील सर्व 177 जणांचा जीव धोक्यात आला होता. यामध्ये सहा क्रू मेंबर्स होते. आपत्कालीन परिस्थिती पाहता विमानाचे पोर्टलँड येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार,  अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग कंपनीच्या विमानाने पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4वाजून 52 मिनीटांनी उड्डाण घेतले होते. मात्र हजारो फुट उंचावर विमानाचा दरवाजा तुटल्याने वैमानिकाने 5 वाजून 30 वाजता पोर्टलँड विमानतळावर पुन्हा वळवले आणि आपत्कालीन लँडिंग केले. हा सर्व थरार विमानातील प्रवाशांच्या क्ॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 केबिनचा मध्यभागी बाहेर पडण्याचा दरवाजा विमानापासून पूर्णपणे वेगळा झाला आहे. अलास्का एअरलाईन्सने एक्सवर आपल्या पोस्टमध्ये म्हंटले की, पोर्टलॅण्डहून ओन्टारियो, कॅलिफोर्नियासाठी बोइंग 737-9 मॅक्स फ्लाइट क्रमांक AS1282 पोर्टलँड ते ओंटारियो, कॅलिफोर्निया सुटल्यानंतर ही दुर्घटना घडली. पण सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरुप बचावले. विमानात सदस्यांसह पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हे नेमके कसे घडले याचा तपास करत आहोत आणि त्यानंतर याबाबक माहिती शेअर करू.

या घटनेमध्ये बोईंग 737 मॅक्सला 1 ऑक्टोबर 2023 ला अलास्का एअरलाईन्समध्ये सहभागी केले गेले होते. त्याने 11 नोव्हेंबर 2023 ला व्यावसायिक सेवेत प्रवेश केला होता. फ्लाईटट्रेडर 24 ने सांगितले की, आतापर्यंत या एअरलाईन्सने 145 उड्डाणे केली आहेत.