आता अमेरिकेतही मिळणार अमूल दूध

अमूल कंपनीचे दूध आता अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. गुजरात सहकारी को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमेरिकन बाजारात अमूल दूध पोहोचवण्याची तयारी केली आहे. यासाठी अमेरिकेच्या मिशिगन मिल्क प्रोडय़ूसर्स असोसिएशन यांच्यासोबत करार केला आहे, अशी माहिती जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दिली. पुढील आठवडय़ात अमूलचे दूध अमूल ताजा, अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल स्लीम एन ट्रिम असे चार प्रकारांतील दूध उपलब्ध केले जातील.