सावत्र पित्याने नदीत ढकलले, मुलीने 100 नंबरवर फोन करुन वाचवला जीव

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून किर्तना नावाच्या एका तेरा वर्षीय मुलीने धाडस करत आपला जीव वाचवला आहे. रविवारी सकाळी एका मुलीचा साधारण साडेतीनच्या सुमारास 100 नंबरवर फोन आला होता. त्यात तिने मला वाचवा,मी गोदावरी नदीच्या रावुलापलेम गौतमी पुलावर असलेल्या प्लास्टीक पाईपला लटकत आहे. तिच्या फोननंतर पोलिसांनी ताबडतोब रावुलापलेम पोलीस आणि हायवे मोबाइल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिची सुटका केली. मुलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कीर्तना असे त्या मुलीचे नाव आहे. तिला पुलावरून ढकलून देण्यात आले, मात्र सुदैवाने प्लास्टिकच्या केबल पाईपला पकडण्यात तिला यश आले आणि तिने पोलिसांची मदत घेतली. पुढे किर्तनाने सांगितले की, तिची आई पुष्पाला सुहासिनी (36) आणि लहान बहीण जर्सी (1) हिच्यासोबत पुलावरून ढकलण्यात आले.सध्या पोलीस तिची आई आणि लहान बहिणीचा शोध घेत आहेत. हा धक्का त्यांना उलवा सुरेशनेदिला असून तो आईसोबत राहतो. या घटनेनंतर सुरेश बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावरुन खाली पडताना किर्तना एका प्लास्टिक पाईकला पकडण्यात यश आले, त्यामुळे ती थोडक्यात बचावली. ती लटकत असतानाही तिने पोलिसांना फोन करुन मदत मागितली.ती नेमकी कुठे लटकली आहे ते ठिकाणही योग्यरित्या सांगितले. त्यामुळे पोलिसांची तिला लगेच मदत मिळाली. सध्या किर्तनाच्या आई आणि बहिणीचा नदीत शोध सुरु आहे. तिने सांगितले की, सुरेशने राजा महेंद्रवरम येथे जाऊया असेल सांगितले होते आणि त्यासाठी एका गाडीची व्यवस्थाही केली होती. आई, लहान बहिण आणि किर्तना त्याच्यासोबत महेंद्रवरमला जात होते. मात्र सुरेश यांनी अचानक सेल्फी घेण्याचे कारण सांगत रावुलापलेम ब्रिजवर गाडी थांबवली. त्यांनी गाडीतून बाहेर यायला सांगितले आणि पुलाजवळ आम्हाला घेऊन गेले.तेव्हाच त्याने आम्हाला तिघींना नदीत ढकलले आणि तो फरार झाला.