चित्रपटासाठी 18 कोटी मानधन मागितलं, अनिल कपूर यांना ‘वेलकम – 3’मधून बाहेरचा रस्ता?

अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या तुफान केमिस्ट्रीने गाजलेला वेलकम हा चित्रपट आठवत असेल. आता त्याच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. पण, त्याचं कारण अनिल कपूर ठरले आहेत. वेलकमच्या तिसऱ्या भागात अनिल कपूर दिसणार नाहीत, अशा चर्चा आहेत.

कारण, अनिल कपूर यांनी जास्त मानधन मागितल्याने त्यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वेलकमच्या तुफान यशानंतर त्याचा सिक्वलही हिट ठरला होता. नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या अफलातून विनोदी जुगलबंदीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. त्यानंतर अनिल कपूर यांनी तगडं मानधन मागितल्याचं बोललं जात आहे.

अनिल कपूर यांनी 18 कोटी इतकं मानधन मागितल्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. दिशा पाटनी, अर्शद वारसी, सुनील शेट्टी, कृष्णा अभिषेक, जॅकलीन फर्नांडिस आणि संजय दत्त या चित्रपटात झळकणार आहे.