एआय सॉफ्टवेअर इंजिनीअरची एन्ट्री

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात नोकरी कपात केली जात आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आता जगातल्या पहिल्या एआय सॉफ्टवेअर इंजिनीअरची एन्ट्री झाल्याने पुन्हा एकदा नोकऱ्यांची बोंबाबोंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे एक नवीन एआय टूल आहे. या टूलला अमेरिकन एआय लॅब कॉग्निशनने बनवले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा जगातील पहिला एआय सॉफ्टवेअर इंजिनीअर असून याचे नाव डेविन ठेवले आहे. डेविन कोडिंग, वेबसाईट आणि कोडिंग प्रोगामर यांसारखी खूप सारे कामे सहज करू शकतो तसेच आपल्या साथीदारांना मदतसुद्धा करू शकतो.

हा एक सुपर क्लिक एआय इंजिनीअर आहे. त्यामुळे आता असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, हे सॉफ्टवेअर माणसांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आणू शकते. हा टीमसोबत मिळून काम करेल आणि इंजिनीअर व्यक्तीला मदतसुद्धा करू शकेल. गरज पडल्यास हा एकटाच अनेकांची कामे करेल.
कंपनीने अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये यासंबंधी सर्व माहिती दिली आहे. अवघड समस्यासुद्धा तो सहज हाताळू शकतो. डेविनने इंजिनीअर इंटरह्यूसुद्धा पास केला आहे. डेविनचा इंटरह्यू एका प्रसिद्ध कंपनीने घेतला होता.

काय करणार डेविन?
डेविन नावाचा एआय सॉफ्टवेअर इंजिनीअर अनेक अत्याधुनिक फीचर्ससोबत येतो. अनेक कठीण टास्कला सहज सोडवू शकतो. या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये कोडिंग, डिबगिंगसारखे काम करू शकतो. डेविनमध्ये मशीन लार्ंनग अल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे याचा खूप फायदा होतो.