Liquor Policy Case : ‘अरविंद केजरीवाल यांना पाठवा मेसेज…’; पत्नी सुनिता यांनी उघडली व्हॉट्सअ‍ॅपवर मोहीम

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडी कोठडीत आहेत. आता त्यांची पत्नी सुनिता केजरीवला यांनी जनतेला आवाहन करत केंद्रातील भाजप सरकार विरोधात दंड थोपटले आहेत. ‘केजरीवाल को आशीर्वाद’ ही मोहीम सुनिता सुनिता केजरीवाल यांनी सुरू केली आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुनिता केजरीवाल यांनी केले आहे.

‘केजरीवाल को आशीर्वाद’ या मोहीमेतून नागरिकांनी आशीर्वाद आणि प्रार्थनांच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन सुनिता केजरीवाल यांनी केले आहे. सुनिता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत या मोहीमेसाठी एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही जारी केला आहे.

ईडी खंडणीचे रॅकेट चालवतेय! केजरीवालांचा भर न्यायालयात हल्ला

नागरिकांनी आपले आशीर्वाद आणि प्रार्थना व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 8297324624 वर पाठवावेत. मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला आम आदमी पार्टीचे असण्याची गरज नाही. सर्व नागरिक मेसेज पाठवू शकतात. ‘माझे पती खरे देशभक्त आहेत. त्यांनी ज्या प्रकारे न्यायालयात आपली बाजू मांडली आहे, त्यासाठी मोठे धाडस लागते’, असे सुनिता केजरीवाल म्हणाल्या.

हे राजकीय षडयंत्र असून…! अरविंद केजरीवाल यांचा ED कारवाईवरून निशाणा

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्चला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सुनावणीत मुख्यमंत्री केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत म्हणजे 4 दिवसांची वाढ केली आहे.