खार-सांताक्रुझ उड्डाणपूल अखेर रद्द; रहिवाशांच्या विरोधामुळे निर्णय

खार-सांताक्रुझ परिसरातील 140 इमारतींना खार-सांताक्रुझ सब वे उड्डाणपुलामुळे बाधा पोहचणार असल्याने रहिवाशांच्या मागणीमुळे हा उड्डाणपूल आता रद्द करण्यात आला आहे. वांद्रे पूर्वच्या गोळीबार मार्गापासून एक पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हा पूल कशाला हवा असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत होता. शिवाय प्रस्तावित केलेला पूल 140 इमारतींच्या अगदी जवळून जात असल्यामुळे रहिवाशांनी या पुलाला विरोध केला आहे.  या पुलासाठी अकराशे कोटींचा खर्च करण्यात येणार होता. हा खर्च वाढून 2400 कोटींवर गेला होता. त्यामुळे हा पूल रद्द करा किंवा डिझाईनमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात येत होती.