भाऊबीजेला या मुहूर्तावर करा ओवाळणी; दिर्घ्यायुष्यासह मिळेल सुखसंपत्ती…

देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. आज बलिप्रतिपदा म्हणजेच नववर्षाची सुरुवात होत आहे. तर बुधवारी भाऊबीज आहे. या सणाबाबतच्या अनेक प्राचीन कथा आहेत. भावाच्या दिघ्यायुष्यासाठी बहीण त्याला ओवाळते आणि भाऊ बहीणाला भेटवस्तू देतो. भाऊबीजेला भावाने बहिणीकडे जाण्याची प्रथा आहे. यंदा भाऊबीज साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, याची माहिती घेऊया.

कार्तिक शुद्ध द्वतीयेला भाऊबीज साजरी करण्यात येते. या तिथीचा संबंध यमराजाशी असल्याने याला यमद्वितीया असेही म्हणतात. या सणाला बहीणकडून ओवाळणी करणाऱ्या व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय राहत नाही, अशी मान्यता आहे. यंदा बुधवारी भाऊबीज असून ओवाळणीसाठी दोन नशुभ मुहूर्त आहेत.

पहिला मुहूर्त सकाळी 6 वाजून 44 मिनिटांपासून 9 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. तर दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10 वाजून 40 मिनिटंपासून दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर ओवाळणी केल्यास सुखसमृद्धी आणि दिघ्यायुष्याची प्राप्ती होणार आहे. ज्यांना हे मुहूर्त साधणार नाही. त्यांनी दिवसभरात कधीही ओवाळणी केली तर चालणार आहे.

या दिवशी कलशावर चौमुखी दीप लावावा, आणि यमराज आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी. पूजा झाल्यावर कलशातील पाणी घरात शिंपडावे आणि घरातील सर्वांच्या आरोग्य चांगले राहवे आणि प्रत्येकाला दिर्घ्यायुष्य मिळावे, अशी प्रार्थना करावी.