हेच पंकजा मुंडे यांचं दुर्दैव आहे… चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत पंकजा मुंडे या त्यांना जवळचा चष्मा लागल्याचे सांगत आहेत. तसेच त्या व्हिडीओत त्या या चष्म्यामुळे आता जवळचं अधिक स्पष्ट दिसायला लागेल, असं सांगत आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय चर्चांनी उधाण आलं आहे. अनेकांनी तर हा जवळच्या व्यक्तींना टोमणा असल्याचे म्हटले आहे.

याबाबत भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी विचारले तेव्हा त्यांनी पंकजा ताई शिंकल्या तरी बातमी होते असं म्हटलं आहे. ”पंकजाताई शिंकल्या काय, हसल्या काय तरी बातमी होतं. हेच त्यांचं दुर्दैव आहे. त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचे नुकसान होते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ त्या आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्याच्या चालीवर ताईला चष्मा लागला असं गाताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी ”लांबचा चष्मा नाही बरं का, जवळचा चष्मा आहे, जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता स्पष्ट दिसायला लागेल. छोटा नंबर आहे. दूरचं आधीही चांगलं दिसत होतं, आताही चांगलं दिसतं”, असं देखील त्या व्हिडीओतून स्पष्ट केलं.