लोकसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही आठवडे आधीच मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ संपायला तीन वर्षं बाकी असताना त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

गोयल यांच्यानंतर आता निवडणूक व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी राजीव कुमार यांच्यावर असणार आहे. निवडणूक आयोगात दोन मुख्य आयुक्तांसह अन्य दोन आयुक्तही असतात. त्यापैकी एक जागा आधीच रिक्त होती. त्यात आता गोयल यांच्या राजीनाम्याची भर पडली आहे. केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्रालयाने यासंबंधी एक अधिसूचना जारी केली असून राष्ट्रपतींनी गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.