सरकारी धोरणांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांची आज दिल्लीत महापंचायत

punjab-farmer-aggitation

पंजाबमधील शेतकरी गुरुवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महापंचायत घेणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या हाकेवर शेतकऱ्यांनी महापंचायतीसमोर उचाना ते जिंद असा पायी मोर्चा काढणार असून सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मोदी सरकारच्या कॉर्पोरेट समर्थक, जातीयवादी, हुकूमशाही धोरणांविरुद्धचा लढा तीव्र करण्यासाठी, शेती, अन्न सुरक्षा, उपजीविका आणि कॉर्पोरेट लुटीपासून जनतेला वाचवण्यासाठी महापंचायत संकल्प पत्र किंवा ठरावाचे पत्र स्वीकारेल, अशी माहिती आंदोलक शेतकरी नेत्यांकडून देण्यात आल्याचं कळत आहे. पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदा करावा आणि सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी हे शेतकरी करत आहेत.