शेजारच्या दुकानात ग्राहकांची होते गर्दी, जळफळाट झालेल्या व्यक्तीने अन्नातून मिसळले विषारी रसायन

अनेकदा काही लोकं पुढे जाणाऱ्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार चीनच्या झेझियांगमध्ये घडला आहे. शेजारच्या फूडशॉपवर ग्राहकांची गर्दी होत असल्याने जळफळाट झालेल्या दुकान मालकाने असे काही केले  की, त्या दुकानात ग्राहक येणेच बंद झाले.

एकेदिवशीदुकानात ली नावाची व्यक्ती आली आणि त्याने फूड शॉपमधून रोल्ड मीट केक खरेदी केला आणि खाल्ला. मात्र त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. बघता बघता जवळपास 9 लोकांना असा त्रास होऊ लागला. त्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तपास केला असता अन्नात सोडियन नायट्रेट मिसळल्याचे समोर आले. ते एक इंडस्ट्रिअल रसायन आहे, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, डोकेदुखी, उल्टी आणि गरगरल्यासारखे होते. काही प्रकरणात तर मृत्यूही होतो. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कळले की, हे कृत्य शेजारच्या दुकान मालकाचे आहे. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली.

मेनलॅंड चीनमध्ये खाद्य सुरक्षेसंदर्भात आणि स्वच्छतेसंबंधीचे घोटाळे सामान्य आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिणी चीनी शहर गुआंगजौजवळील एका रेसटॉरेण्टमध्ये देण्यात येणाऱ्या मानार्थ सूपमध्ये डिश वॉशचे पाणी आणि डिटर्जेंट मिक्स केल्याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेला अटक केली आहे. मागच्या आठवड्यात, पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील एका रेस्टॉरंटच्या मालकाने ग्राहकाने त्याच्या अन्नात उंदराचे डोके आढळल्याची तक्रार केल्यानंतर ते दुकान बंद करावे लागले.