गुगल मॅप सांगेल घराचा पत्ता

 

एखाद्या ठिकाणचे लोकेशन शेअर केले की, इथे तिथे न भरकटता त्या ठिकाणी पोहोचता येते. त्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणचे प्रसिद्ध लोकेशन गुगल मॅपवर शेअर करावे लागते, पण आता तुम्हाला तुमच्या घराचे लोकेशनही शेअर करता येणार आहे. कारण गुगल मॅपच तुमच्या घराचा पत्ता सांगणार आहे. तशी सुविधा गुगलने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी गुगल मॅपमध्ये तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता समाविष्ट करावा लागणार आहे.  एकदा पत्ता सेव्ह झाला की, तुम्हाला तुमच्या इमारतीचा व्हिडीओही पाहता येईल. तुमच्या इमारतीचे गेटही त्यात दिसेल. तुमचा परिसरही दिसेल. त्यामुळे गुगल मॅपवरून पत्ता शोधणे आणखी सोपे होणार आहे.