Forbes Announced – श्रीमंत सेलिब्रिटीजची यादी जाहीर, वयाच्या 34 व्या वर्षी ही पॉप स्टार बनली जगातील पहिली अब्जाधीश गायिका

Forbes ने अधिकृतपणे जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यात प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये टेलर स्विफ्ट, स्टीव्हन स्पीलबर्ग, किम कार्दशियन, रिहाना तसेच अनेक कलाकारांचा समावेश आहे. सर्वात श्रीमंत ख्यातनाम अब्जाधीशांची एकूण किंमत $31 अब्ज इतकी आहे. मिळालेल्या यादीनुसार, यावेळी अब्जाधीशांनी त्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये $2 अब्ज इतकी भर झाली आहे. दरम्यान, सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती $14.2 ट्रिलियनच्या पुढे गेली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश फिल्म स्टार्सची यादी पुढीलप्रमाणे-

रॅंक      सेलिब्रिटी             संपत्ती
1.       जॉर्ज लुकास         5.5 अब्ज
2.       स्टीफन स्पेलबर्ग     4.8 अब्ज
3.       माइकल जॉर्डन      3.2अब्ज
4.       ओपराह विन्फ्री      2.8 अब्ज
5.       जे-जी                2.5 अब्ज
6.       किम कर्दाशियन    1.7 अब्ज
7.       पीटर जैक्सन        1.5 अब्ज
8.       टेलर पैरी            1.4 अब्ज
9.       रिहाना               1.4 अब्ज
10.     टाइगर वुड्स       1.3 अब्ज
11.     लेबॉर्न जेम्स         1.2 अब्ज
12.     मैजिक जॉनसन     1.2 अब्ज
13.     डिक बोल्फ         1.2 अब्ज
14.     टेलर स्विफ्ट         1.2 अब्ज

 

View this post on Instagram

 

A post shared by Taylor Swift (@taylorswift)

फोर्ब्सने जगातील 14 सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या नावांची घोषणा केली आहे. यावर्षी, फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये हॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते जॉर्ज लुकास यांचे नाव अग्रस्थानी आहे. तसेच वयाच्या 34 व्या वर्षी टेलर स्विफ्टने तिची गाणी आणि कामगिरीच्या आधारे $1.1 अब्जची संपत्ती जमा केली आहे. टेलर स्विफ्टची ही संपत्ती जवळपास 35 देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे चाहते टेलरचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.

टेलर स्विफ्टचे नाव नेहमीच चर्चेत असते. या वर्षी झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्येही तिची बरीच चर्चा होती. कारण चार वेळा सर्वोत्कृष्ट अल्बमचा पुरस्कार जिंकणारी ती पहिली कलाकार ठरली. तिचा ‘1989 (टेलर व्हर्जन)’ हा अल्बम गेल्या वर्षीचा सर्वाधिक विकला जाणारा अल्बम होता.