हिंदुस्थान मोबाईलमध्ये ‘नंबर वन’

टेक्नोलॉजीमध्ये अग्रेसर असलेला हिंदुस्थान देश जगात सर्वाधिक मोबाईल ग्राहक जोडणारा देश ठरला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत हिंदुस्थानात 70 लाखांहून जास्त नवीन मोबाईल ग्राहक वाढले आहेत. हिंदुस्थानात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या तब्बल 112.5 कोटींवर पोहोचली आहे. या यादीत 169.5 कोटींसह चीन दुसऱ्या तर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एरिक्सनच्या एका अहवालानुसार, हिंदुस्थानात स्वस्त इंटरनेट सेवा आणि टेलिकॉम बाजारपेठेमुळे कंपन्यांत स्पर्धा वाढली. स्वस्त मोबाईल मिळत असल्याने ग्राहकांची संख्या वाढली आहे. या वर्षी जूनमध्ये जागतिक स्तरावर एकूण नवीन ग्राहकांची संख्या चार कोटींपर्यंत पोहोचली आहे. यात एकूण ग्राहकांची संख्या 830 कोटी झाली आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत हिंदुस्थानात 70 लाख, चीनमध्ये 50 लाख, तर अमेरिकेत 30 लाख नवीन ग्राहक वाढलेत. दरम्यान, देशात सातत्याने मोबाईलधारकांची संख्या वाढत आहे, असे हिंदुस्थान दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) म्हटले आहे.