टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, लवकरच होणार मोठी घोषणा

टीम इंडियाला ऑगस्ट 2023 मध्ये नवा कर्णधार मिळू शकतो. आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत हिंदुस्थानी संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरू शकतो.

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळवले जातील. कॅरेबियन दौऱ्यानंतर लगेचच टीम इंडिया ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची T20I मालिका खेळणार आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आल्याने टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची अपेक्षा आहे.

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेत नसतील. अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार कोण असणार हा मोठा प्रश्न आहे, कारण लवकरच हिंदुस्थानला श्रीलंकेला जावे लागणार आहे, कारण आशिया कप 2023 तिथे खेळवला जाणार आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध कॅंडी येथे होणार आहे. यामुळे वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.

आता अशा परिस्थितीत, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार होऊ शकतो. तो सध्या T20 संघाचा उपकर्णधार आहे आणि जर तो कर्णधार झाला तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारू शकतो, कारण तो 100 टक्के तंदुरुस्त होऊ शकणार आहे. त्यामुळे त्याची आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी निवड केली जाऊ शकते.