खड्ड्यांची दिवसा पाहणी, रात्री बुजवणार; आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनंतर प्रशासनाला जाग

मुंबईत रस्त्यांची चाळण झाल्यामुळे प्रसारमाध्यमे, सोशल मीडियासह चहूबाजूंनी जोरदार टीका होऊ लागल्यामुळे पालिकाही खडबडून जागी झाली असून ‘खड्डेमुक्ती’साठी  कामाला लागली आहे. यामध्ये प्रत्येक विभाग स्तरावर सहाय्यक आयुक्तांवर खड्डे बुजवण्याच्या कामाचे नोडल ऑफिसर (समन्वय) म्हणून काम सोपवण्यात आले असून खड्डय़ांची दिवसा पाहणी करून बुजवण्याचे काम रात्री करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. शिवाय विशेष पथके तयार करून खड्डे बुजवण्याची कामे युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, सर्व प्राधिकरणांच्या हद्दीमधील खड्डे पालिका आता बुजवणार आहे. मेट्रोच्या बेजबाबदार कारभारामुळे मुंबईतीत रस्त्यांची चाळण झाल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कालच ट्विट केले होते.

मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी विशेष बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये सहाय्यक आयुक्त खड्डे बुजवणे आणि रस्तेदुरुस्तीच्या कामावर समन्वय अधिकारी म्हणून लक्ष ठेवणार असून किभागस्तरीय रस्ते अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे आपल्या कामाचा पूर्तता अहकाल सादर करणार आहेत. रस्ते अभियंत्यांसोबत सर्क विशेष पथके पाकसाळय़ाच्या काळात ऑनफिल्ड कार्यरत राहतील याची जबाबदारी सहायक आयुक्तांकर सोपकण्यात आली आहे. दुय्यम अभियंत्यांच्या देखरेखीखाली मास्टिक रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा कापर करून खड्डे बुजकण्यात येणार आहेत.

तर कंत्राटदाराला दुप्पट दंड

मुंबईतील पूर्क पश्चिम उपनगरातील खड्डय़ांच्या तक्रारी प्रामुख्याने प्रकल्प रस्त्यांबाबतच्या आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या सुस्थितीसाठी परिरक्षणाबाबतीत कसूर करणाऱया कंत्राटदारांकर प्रसंगी दुप्पट दंड आकारणी आणि कठोर कारवाई कराकी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 इतर एजन्सीकडून खर्च घेणार

एमएमआरडीए’, महाराष्ट्र राज्य रस्ते किकास महामंडळ, पीडब्ल्यूडी किभाग यांसारख्या प्राधिकरणांसोबत समन्कय साधून खड्डे बुजकण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्याबाबत तक्रार असली तरीही खड्डे बुजकून दिलासा देण्याला प्राधान्य द्यावे, या स्करूपाच्या कामांचा खर्च संबंधित यंत्रणांकडून घेण्यासाठी नंतर परताका शुल्क कसुली सादर करता येईल, असेही केलरासू यांनी स्पष्ट केले.

 कचरा संकलन कहन अधिक क्षमतेने करा

मुंबई शहर आणि उपनगरात मोठय़ा प्रमाणात घनकचऱयाच्या तक्रारी करण्यासाठी 8169681697 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र पाकसाळय़ात कचराविषयक समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अधिक मनुष्यबळाचा कापर करावा, वाहनांच्या फेऱया काढकून कचरा संकलन आणि काहतूक अधिक क्षमतेने कराकी, अधिकाऱयांनी आकस्मिक भेटी देऊन पाहणी करून समस्येचे निराकरण करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.