‘जाणीव उद्याची, स्त्री मनाची’ने दिली नवी उमेद

मनातली जाणीव दिवाळी अंक व निनाद प्रकाशनातर्फे महिला दिनानिमित्त ‘जाणीव उद्याची, स्त्राr मनाची’ हा कार्यक्रम दादरच्या श्री छत्रपती शिवाजी मंदिर सभागृहात पार पडला. यावेळी निर्माती व अभिनेत्री जीजा नांदगावकर, ज्येष्ठ पत्रकार मनीषा रेगे, बिट्स एण्ड बाईट्स विद्या बारसकर, पत्रकार मनीषा म्हात्रे, उद्योजिका मंजिरी निरगुडकर-राव यांचा सत्कार करण्यात आला.

तुमच्या आयुष्यातील प्रभाव टाकणारी ‘ती’ या विषयावरील परिसंवादात दिग्दर्शक केदार शिंदे, माईंड रीडर केदार परुळेकर,अभिनेता हृषिकेश शेलार, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, स्त्राrरोगतज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर, शेफ स्मिता देव, सरोज स्वीटसच्या मनिषा मराठे यांनी विचार मांडले.

संपादिका व पत्रकार सोनल खानोलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘केतकी स्वर’ केतकी भावे, स्वरा जोशी यांचा सांगीतिक कार्यक्रम झाला. मनोगत व्यक्त करताना सोनल यांनी सांगितले, समाजातील झटणाऱया महिलांना उमेद देण्यासाठी हा सोहळा मी सातत्याने करते. परिसंवादातून विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे हे एक वैचारिक व्यासपीठ आहे.

केदार परुळेकर यांनी प्रेक्षकांतील एका व्यक्तीला बोलावून त्यांच्या मनातले अचूक नाव ओळखून उपस्थितांना थक्क केले. साहित्यिका डॉ. विजया वाड यांचे मार्गदर्शन लाभले. स्मिता गवाणकर यांनी बहारदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी 10 महिलांना लकी ड्रॉद्वारे कुबल मसाले, ज्योवीस वेलनेस, निरगुडकर फार्मतर्फे भेट देण्यात आली.
शिवसेनेत इनकमिंग जोरात