Lok Sabha Election 2024 : “झुठ का दरबार-मोदी सरकार”, लालू प्रसाद यादव यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून देशभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी देशभरात प्रचाराच्या तोफा धडाडत असून बिहारमध्येही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे देखील मैदानात उतरले असून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

लालू प्रसाद यादव यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने खोटी आश्वासने दिल्याचा आरोप लालू यांनी केला आहे. “झुठ का दरबार-मोदी सरकार” असे म्हणत लालू यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.

मोदी सरकारने खोटेपणाचा कळस गाठल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला. मोदी सरकारने नोकऱ्यांबाबत खोटं, इतिहासाबाबत खोटं, विकासाबाबत खोटं, आश्वासनांमध्येही खोटं, प्रत्येक गोष्टीत खोटं, प्रत्येक विचारात खोटं, इकडे खोटं, तिकडे खोटं, उजवीकडे-डावीकडे खोटं, घराणेशाहीवर खोटं, भ्रष्टाचारावर खोटं… इतकं खोटं कोण बोलतं? जनतेने आता मोदी सरकारचे खोटं पुसून टाकण्याचा निर्धार केला आहे, असे ट्विट लालू प्रसाद यादव यांनी केले आहे.

दरम्यान, बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. येथे 7 टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 4, दुसऱ्या टप्प्यात 5, तिसऱ्या टप्प्यात 5, चौथ्या टप्प्यात 5, पाचव्या टप्प्यात 5, सहाव्या टप्प्यात 8 आणि सातव्या टप्प्यात 8 मतदारसंघात मतदान पार पडेल.

पहिला टप्पा- 19 एप्रिल

औरंगाबाद
गया
नवाडा
जमुई

दुसरा टप्पा – 26 एप्रिल

किशनगंज
कटिहार
पूर्णिया
भागलपूर
बंका

तिसरा टप्पा – 7 मे

जाहिरात
झांझारपूर
सुपौल
अररिया
मधेपुरा
खगरिया

चौथा टप्पा – 13 मे

दरभंगा
उजियारपूर
समस्तीपूर
बेगुसराय
मुंगेर

पाचवा टप्पा – 20 मे

सणाची ऑफर
सीतामढी
मधुबनी
मुझफ्फरपूर
सारण
हाजीपूर

सहावा टप्पा – 25 मे

वाल्मिकी नगर
पश्चिम चंपारण
पुर्वी चंपारण
शेओहर
वैशाली
गोपालगंज
सिवान
महाराजगंज

सातवा टप्पा – 1 जून

नालंदा
पाटणा साहिब
पाटलीपुत्र
आराह
बक्सर
सासाराम
करकट
जहानाबाद