Lok Sabha Election 2024 : भाजपच्या महिला उमेदवाराकडे 1400 कोटींची संपत्ती; वाचा कोण आहेत आणि काय-काय आहे त्यांच्याकडे…

देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचार सभा घेण्यापर्यंत सर्व ठिकाणी उमेदवार मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत आहेत. उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याकडे असलेल्या संपतीची माहितीही यावेळी जाहीर केली जाते. सध्या चर्चेत आहेत भाजपच्या एक महिला उमेदवार. याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे आहे तब्बाल 1400 कोटींची संपत्ती. त्यांच्याकड्या असलेल्या गडगंज संपत्तीची माहिती सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चला तर पाहूया त्या आहेत तरी कोण…

दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपने पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी जाहिर केली आहे. पल्लवी डेम्पो या उद्योजक श्रीनिवास डेम्पो यांच्या पत्नी आहेत. डेम्पो ग्रुप हा फ्रँचायजी फुटबॉल लीग, रीअल इस्टेट, जहाजबांधणी, शिक्षण आणि खाण उद्यागोशी निगडीत आहे. पल्लवी डेम्पो यांनी मंगळवारी (16 एप्रिल 2024) दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यलयात उमेदवारी अर्ज आणि 119 पानांचे प्रतिज्ञापत्र रिटर्निंग ऑफिसरसमोर सादर केले. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार श्रीनिवास डेम्पो यांच्यासह पल्लवी डेम्पो यांची एकूण संपती 1,400 कोटी रुपये आहे. पल्लवी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर श्रीनिवास यांच्याकडे असलेल्या मातमत्तेचे मुल्य 994.8 कोटी रुपये आहे.

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात शुक्रवारी मतदान

श्रीनिवास डेम्पो यांच्या गोवा आणि देशाच्या इतर भागांमध्ये मालमत्ता आहेत. तसेच दुबईमध्येही त्यांच्या मालकीचे एक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटचे बाजार मूल्य 2.5 कोटी रुपये आहे. तसेच लंडनमध्ये सुद्धा 10 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे. पल्लवी डेम्पो यांच्या स्थावर मालमत्तेचा विचार केला तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य 28.2 कोटी रुपये आहे तर, श्रीनिवास यांच्या स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य 83.2 कोटी रुपये आहे.

पल्लवी यांच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. तीन वेगवेगळ्या सीरिजच्या मर्सिडीज बेंझ कार त्यांच्याकडे आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 1.69 कोटी, 16.42 लाख आणि 21.73 लाख रुपये आहे. तसेच 30 लाख किंमतीची कॅडिलेक कार आणि 16.26 लाक रुपये किंमतीची महिंद्रा थार एसयूव्हीही त्यांच्याकडे आहे. पल्लवी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 5.7 कोटी रुपयांचे सोने आहे.

संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मत देणार का? धाराशीवच्या महारॅलीत आदित्य ठाकरे यांचा घणाघाती सवाल

49 वर्षीय पल्लवी डेम्पो यांनी एमआयटी (MIT) आणि पुणे विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्याकडे 217.11 कोटी रुपयांचे रोखे, 12.29 कोटी रुपयांची बचत आणि जवळपास 9.75 कोटी रुपयांच्या इतर गोष्टींचा समावेश आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर पल्लवी यांनी 10 कोटी रुपयांचा आयकर रिटर्न भरलेला आहे. पती श्रीनिवास यांनी 11 कोटी रुपयांचा आयकर रिटर्न भरला आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे.