Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात शुक्रवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संध्याकाळी संपला. आता येत्या 19 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांमध्येही शुक्रवारी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात या 5 मतदारसंघात होणार मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रतल्या विदर्भातील 5 मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या 5 मतदारसंघात येत्या शुक्रवारी मतदान होणार आहे.

Lok Sabha Election 2024 : आता भाजपची गच्छंती निश्चित आहे! प्रियांका गांधींनी डागली तोफ

देशभरात पहिल्या टप्प्यात कुठे-कुठे होणार मतदान?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी देशभरात 102 मतदारसंघांसाठी मतदान होईल. एकूण 21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये हे मतदारसंघ आहेत. यात अरुणाचल प्रदेशातील 2, आसाममधील 5, बिहारमधील 4, मध्य प्रदेशातील 6, महाराष्ट्रातील 5, मणिपूरमधील 2, मेघालयातील 2, राजस्थानमधील 12, तामिळनाडूतील 39, यूपीतील 8, उत्तराखंडमधील 5, पश्चिम बंगालमधील 3 आणि त्रिपुरा, मिझोराम, सिक्कीम, नागालँड, अंदमान निकोबार, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप, पुदुच्चेरी आणि छत्तीसगड ही राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे.

Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसवर टीका करणं भोवलं; KCR यांना निवडणूक आयोगाची नोटीस