Lok Sabha Election 2024 : आता भाजपची गच्छंती निश्चित आहे! प्रियांका गांधींनी डागली तोफ

priyanka-gandhi

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या ठिकाणी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार इमरान मसूद यांच्या प्रचारासाठी रॅली काढली. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत येथील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच जनतेतील हा उत्साह, हा जोश परिवर्तनाची चाहूल आहे. बेरोजगारी आणि महागाईने निराश झालेल्या लोकांना आता बदलाची आशा दिसू लागली आहे. हा उत्साह आशेची झलक आहे. जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची गच्छंची निश्चित आहे. जुड़ेगा भारत, जीतेगा इंडिया, असे प्रियांका गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आज जे सत्तेत आहेत ते सत्याचे उपासक नाहीत, ते ‘सत्तेचे’ उपासक आहेत. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला ते जातील. सत्तेसाठी ते सरकारे पाडतील, आमदार, खासदार विकत घेतील आणि देशाची संपत्ती त्यांच्या श्रीमंत मित्रांना देतील. ही आपल्या देशाची परंपरा नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपच्या अब की बार 400 पार च्या दाव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

भाजपने आधीच काही तरी गडबड करून ठेवली आहे. त्यामुळे 400 जिंकण्याचा दावा ते करत आहेत, असे प्रियांका म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ‘अबकी बार 400 पार’अशी घोषणा करण्यात येत आहे. भाजपने आधीच काही तरी गडबड करून ठेवली आहे. त्यामुळे 400 जागा जिंकण्याचा दावा ते करत आहेत. या निवडणुकीत ईव्हीएममध्ये कुठलीही गडबड झाली नाही आणि भाजपने काही गडबड केली नसले तर त्यांना 180 पेक्षा जास्त जागा मिळणारच नाही, असा ठाम दावाही प्रियांका गांधी यांनी केला.