छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर; मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्याने राजकीय चर्चा सुरू

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. त्यातच मराठा समजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यास छगम भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाचील यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता मनोज जरांगे यांनी खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक वर्तवितर्क लढवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची आहे, असा दावा जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या या राजकीय वक्तव्याने राजकीय वातावरण तापत आहे.

नेवासा येथे होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मराठा आणि धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी लढा सुरूच ठेवावा, अशी मागणी धनगर सामाजाने केली आहे. मात्र, आता जरांगे यांच्या राजकीय वक्तव्याने राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.