महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीचा आढावा

फाईल फोटो

ग्रॅण्ड हयात हॉटेलला भेट देऊन केली पाहणी

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीला शह देण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी बनवलेल्या इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज या बैठकीच्या तयारीचा आढावा घेतला.

वाकोला येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज ग्रॅण्ड हयातला भेट दिली. त्यांनी हाटेलची पाहणी करून तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच बैठकीच्या तयारीबाबत चर्चा केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, पक्षाचे सचिव-खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते नसीम खान, वर्षा गायकवाड, संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र वर्मा आदी याप्रसंगी उपस्थित होते.