ऑनलाईन ऑर्डर केला होता मोबाईल, पार्सलमध्ये आला बॉम्ब

ऑनलाईनमध्ये अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडत असतात. ऑनलाईन वस्तू मागवलेली असते आणि भलतीच वस्तू हातात येते. मात्र आलेले पार्सल जीवघेणे असेल तर? असेच काहीसे एका व्यक्तीसोबत घडले आहे. मैक्सिकोतील गुआनाजुआतोच्या लियोनमध्ये राहणाऱ्या अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन दुकानातून मोबाईल ऑर्डर केला आणि पार्सल उघडल्यावर त्यात बॉम्ब सापडला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, जॅम प्रेसचा हवाला देत लिहीले आहे की, हे कुरिअर मागच्या सोमवारी आले होते, तर त्या व्यक्तीच्या आईने ते कुरिअर घेतले आणि आत किचनच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवले होते. तिला माहित नव्हते की त्या पार्सलमध्ये काय आहे ते. त्यानंतर त्या व्यक्तीने पार्सल खोलल्यावर त्याला धक्काच बसला. पार्सलमध्ये मोबाईल नसून त्यात ग्रेनेड बॉम्ब होता. त्याने त्याचा फोटो काढला आणि ऑनलाईन शेअर केला. त्याने फोन कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या घरी बॉम्ब स्कॉडला पाठवण्यात आले. रक्षामंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या घरी वेढा घातला.

सुदैवाने तो बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आले. सध्या या कुरिअरचा तपास सुरु आहे. अद्याप त्या कुरीअरमधअये ग्रेनेड कुठून आले याचा शोध लागलेला नाही. हा मॅक्सिकोत प्रतिबंधित आहे. देशात ड्रग्स विक्री करणारा मोठा समूह आहे. ते आपआपसात भांडतात. एकमेकांना संपवून टाकण्यसाठी ते बॉम्ब आणि हत्यारांचा वापर करतात. मागच्या सहा वर्षात पोलिसांनी गुआनाजुआतो येथून 600 हून अधिक स्फोटके जप्त केली आहेत.