हार्दिक पांडय़ाचा भाऊ लफंगा

 

क्रिकेटपटू हार्दिक पांडय़ाच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी  फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. वैभव पांडय़ा असे आरोपीचे नाव असून हार्दिक आणि कृणाल पांडय़ा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभवला अटक करण्यात आली. हार्दिक, कृणाल आणि वैभव या तिघांनी मिळून 2021 मध्ये पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. यात हार्दिक आणि कृणालचे प्रत्येकी 40 टक्के शेअर आणि वैभव पांडय़ाचे 20 टक्के शेअर होते. पॉलिमर व्यवसाय व्यवस्थित सुरू असतानाच वैभवने भागीदारीच्या अटींचे उल्लंघन करून त्याच व्यापारात अन्य फर्म स्थापन केली आणि नफा तिथे हस्तांतरित केला. त्यामुळे हार्दिक आणि कृणालचे जवळपास चार कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच भागीदारी फर्मच्या खात्यातून एक कोटींपेक्षा रुपये स्वतःच्या खात्यावर वळवले.

हार्दिक, कृणाल आणि वैभव या तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला. व्यवसायात तिघांचेही भांडवल असेल आणि तिघेही भांडवल देऊन फर्म चालवण्याची जबाबदारी स्वीकारतील, असे ठरले होते.

 

सावत्र भावाकडून हार्दिकची फसवणूक

हार्दिक पांडय़ा आणि कृणाल पांडय़ाचे 4.3 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सावत्र भावाने अटींचे उल्लंघन केले. वैभवने भावाला न सांगता त्याच व्यवसायात दुसरी फर्म सुरू केली. यामुळे मुख्य कंपनीचे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. सावत्र भावाने कोणालाही न कळवता त्याचा नफा 20 टक्क्यांवरून 33.3 टक्क्यांपर्यंत वाढवला. त्यामुळे हार्दिक आणि कृणालचे नुकसान झाले. सावत्र भावाने भागीदारी असलेल्या फर्मच्या खात्यातून लाखो रुपये वळवले.

वैभववर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.  व्यवसायातून मिळणारा नफाही त्याच प्रमाणात वाटून घ्यायचा होता. हा नफा प्रत्येक व्यक्तीच्या या व्यवसायातील सहभागानुसार वाटून घ्यायचा होता. मात्र वैभवने तसे केले नाही. कंपनीचा नफा आपल्या भावांना देण्याऐवजी वैभवने वेगळी कंपनी स्थापन करून सर्व नफा लाटला.