नांदेड – सरकारचा निषेध करत मराठा तरुणाची आत्महत्या

नांदेडमधील मुदखेड येथील संजय गोविंदराव खानसोळे (35) यांनी शुक्रवारी पहाटे सरकारचा जाहीर निषेध करून मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी अविरतपणे आंदोलन चालू आहे. सरकारने सरसकट सगे सोयऱ्यांना आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे शासनाच्या या आडमुठेपणाला कंटाळून 15 मार्च रोजी सकाळी पाचच्या सुमारास खानसोळे यांनी स्वतःच्या राहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने माझ्या लेकराबाळांचे भविष्य अंधारात दिसत असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

सरकारचा जाहिर निषेध, एक मराठा लाख मराठा

मयत संजय खानसोळे यांच्या पश्चात वडील, आई, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शासन अजुन किती आत्महत्येंची वाट पाहणार आणि किती जणांचे संसार उद्धवस्त करणार, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासनाने त्वरीत निर्णय घेऊन मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली जात आहे.