कुणीतरी रस्त्यावर येणार, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाच्या इंस्टास्टोरीने खळबळ

अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक व क्रिकेटपटू हार्दीक पांड्या यांच्यामध्ये सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नताशा व हार्दीकचा घटस्फोट होणार असून त्याच्या 70 टक्के संपत्तीवर नताशा दावा ठोकणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे. अशातच आता नताशाने ठेवलेल्या एका इंस्टा स्टोरीमुळे क्रिडा व मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नताशाने इंस्टाग्रामवर ठेवलेल्या एका स्टोरीमध्ये ड्रायव्हिंग स्कूलच्या साईनबोर्डचा फोटो असून त्यावर ”कुणीतरी रस्त्यावर येणार आहे” असे इंग्लिशमध्ये लिहलेले आहे. तिच्या या स्टोरीवरून नेटकऱ्यांनी तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नताशाने इंस्टाग्रामवरून तिचे पांड्या हे आडनाव देखील हटवले आहे. नताशा आधी इंस्टाग्रामवर नताशा स्टॅनकोविक पांड्या असे नाव लावायची. मात्र दोन दिवसांपूर्वी नताशाने पांड्या आडनाव काढून टाकल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान दोन महिन्यापूर्वी नताशाचा वाढदिवस होता त्यावेळीही हार्दीकने तिच्यासाठी काहीच पोस्ट केले नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @natasastankovic__

नताशा व हार्दीकच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ती आज एका तरुणासोबत एका कॅफेमध्ये जाताना देखील पॅपाराझिंना दिसली. तिचे त्या तरुणासोबतचे कॅफेमध्ये जाताना व बाहेर येतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून अनेकांना नताशासोबत असणार तो तरुण कोण असा प्रश्न पडला आहे.