अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर

पावसाच्या रेड अलर्टमुळे मुंबई विद्यापीठाने 27 जुलै रोजी होणाऱया 15 परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा आता 1, 5, 8 व 11 ऑगस्ट रोजी होणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा पेंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

27 जुलैची बीपीएड व एमपीएडची परीक्षा 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. तृतीय वर्ष बीए सत्र 5, एमए सत्र 1, एमए सत्र 1, एमकॉम सत्र 4, एमएससी आयटी व एमएससी कॉम्प्युटर सायन्स (60ः40) सत्र 4, एमएससी गणित (80ः20) सत्र 4, एमसीए सत्र 3 यांच्या परीक्षा 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच द्वितीय वर्ष बीबीए/ एलएलबी ( 5 वर्षीय कोर्स ) सत्र 3 व 4 ही परीक्षा 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.

एमए / एमएससी अॅण्ड एमएससी रिसर्च सत्र 1 ची परीक्षा 11 ऑगस्ट रोजी होणार आहे, असे मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले.