सात तलावांत दहा महिने पुरेल इतका पाणीसाठा

मुंबईला अप्पर कैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य कैतरणा, भातसा, किहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्यापर्यंत पडलेल्या पावसामुळे या सात तलावांत दहा महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास किलंब लागत असल्याने तलाव तळ गाठत आहेत. त्यामुळे पालिकेला एक ते दोन महिने पाणीकपात लागू करून नियोजन करावे लागत आहे. या वर्षीदेखील पालिकेने 1 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीदेखील पाणीसाठा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे 27 जूनपासून पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे दोन आठवडय़ांनंतर पाणीकपात मागे घेण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी पाणीकपात कधी रद्द होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. सद्यस्थितीत जमा झालेले पाणी पुढील 306 दिवसांना म्हणजेच दहा महिन्यांना पुरणारे आहे.