गुगलच्या नऊ कर्मचाऱयांना अटक

 न्यूयॉर्क आणि सनीवेल, कॅलिपहर्निया येथील गुगलच्या कार्यालयांमध्ये नऊ कर्मचाऱयांना मंगळवारी अटक करण्यात आली. गुगलने इस्रायलसोबत केलेल्या 2021 च्या कराराच्या विरोधात कर्मचारी धरणे आंदोलन करत होते. एका आंदोलकाने अटकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. न्यूयॉर्कमधील गुगलच्या कार्यालयात पोलीस आले आणि आंदोलकांना शांत राहण्यास सांगितल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. असे न केल्यास अटक करण्याचा इशारादेखील पोलिसांनी दिला. मात्र आंदोलक ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.  गुगलच्या प्रवक्ते बेली टॉमसन यांनी सांगितले की, इतर कर्मचाऱयांच्या कामात अडथळा आणणे, हे पंपनीच्या धोरणाच्या विरोधात आहे.