परळी न.प.प्रशासनाने जरांगे पाटलांच्या कार्यक्रमाचे शहरातले बॅनर हटवले

मनोज जरांगे पाटील यांच्या परळी येथे होणाऱ्या महासंवाद बैठकीच्या आयोजकांना नोटीसा बजावल्यानंतर परळी न.प.प्रशासनाने या कार्यक्रमाचे शहरात लावलेले बॅनर हटवण्याचे काम सुरू केले आहे.बुधवार दि.20 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या महासंवाद बैठकीचे आयोजन येथील मोंढा मैदानात केले गेले होते.

मात्र या बैठकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने या बैठकीच्या 28 आयोजकांना परळी शहर पोलीसांनी कलम 149 सीआरपीसी प्रमाणे नोटीसा बजावल्या होत्या.आता या महासंवाद बैठकीच्या आयोजनाचे शहरभर लावलेले बॅनर प्रशासनाने काढून टाकायला सुरुवात केली आहे.दरम्यान आयोजकांनी कार्यक्रमासाठी संभाजीनगर खंडपीठात धाव घेणार असल्याचे सांगितले.