विमानात कारगील हीरोचा अनोखा सन्मान

इंडिगोच्या दिल्ली ते पुणे या विमानात कारगील युद्धातील हीरो परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार यांचे नुकतेच जोरदार स्वागत करण्यात आले आहे. विमानातील प्रवाशांमध्ये कारगील हीरो संजय कुमार असल्याचे विमानाच्या कॅप्टनला समजताच त्यांनी केबिनबाहेर येऊन प्रवाशांना  माहिती दिली.

सुभेदार मेजर संजय कुमार यांनी शत्रूंवर कशाप्रकारे हल्ला चढवला, हल्ल्यादरम्यान त्यांना गोळी कशी लागली हा थरारक प्रसंग प्रवाशांसमोर उलगडला. त्यानंतर इंडिगो एअरलाईन्सच्या स्टाफच्या वतीने संजय कुमार यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सहप्रवाशांनी देखील टाळ्या वाजवून या रियल हीरोचे कौतुक केले. इंडिगो एअरलाईन्सने ट्विट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.