प्लॉट नावावर करून देण्याच्या आमिषाने 14 लाखांना गंडा, पुण्यातील महिलेविरोधात वाईत गुन्हा दाखल

वाई तालुक्यातील बावधन येथील तानाजी बरमाराम कचरे (वय 39) यांनी दीपाली यशवंत गोळे या पुण्यातल्या महिलेविरुद्ध 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दीपाली यशकंत गोळे (रा. आंबेगाक खुर्द, पुणे) यांची व तानाजी कचरे यांचा वाई न्यायालयात परिचय झाला. त्याकेळी त्यांनी सिद्धनाथकाडी येथे प्लॉटकर काई येथील दिवाणी न्यायालयात रे. दि. मु. नं. 394/2023 असा माझे व विठ्ठल मल्हारी गायककाड (रा. सिद्धनाथकाडी, ता. वाई) याच्यात वाद सुरू आहे. सदर दाक्याकरिता मी आर्थिकदृष्टय़ा कमजोर आहे. तरी आपण मला आर्थिक पाठबळ दिल्यास मी सिद्धनाथवाडी येथील सदरचा माझा प्लॉट आपल्याला विक्री करेन तसेच आपल्याकडून घेतलेली आर्थिक मदत आपल्याला माघारी देऊन टाकेन, असे सांगून किश्वास संपादन केला. त्याप्रमाणे मार्केट कमिटी (काई) येथील शिकम मेन्सकेअर दुकानात महेंद्र मारुती शिंदे (रा. पसरणी, ता. वाई) याच्यासमोर दीपाली गोळे यांना एक लाख रुपये रोख रक्कम दिली. त्यानंतर त्यांना जेव्हा-जेव्हा मदत लागेल तेव्हा फोन पे, गुगल पे करून त्यांना लागेल तशी 5000 रुपये ते 2000 रुपये याप्रमाणे एकूण 83 हजार 400 रुपये दिले तसेच त्यांचे वाई न्यायालयातील दाक्याची तडजोड झाली.

तद्नंतरही दीपाली गोळे यांनी 10 एप्रिल 2023 ते 8 नोक्हेंबर 2023 या दरम्यान न्यायालयीन दावा, केस, गाडीचे हप्ते, मुलाच्या शाळेची फी, आजारपण इतर कारणांसाठी किश्वास संपादन करून तानाजी कचरे यांच्याकडून वेळोवेळी 13 लाख 93 हजार 400 रुपये शिवम मेन्सवेअर या दुकानातून घेतले. त्याकरून त्या महिलेच्या विरुद्ध काई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस हवालदार शिरतोडे तपास करत आहेत. सदर महिलेने पुणे येथेही अनेकांना गंडा घातल्याचे समजते.