राहुल गांधींची शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक, वाचा पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 मध्ये राहुल याच जागेवरून चार लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल यांनी शपथपत्रामध्ये आपल्या संपत्तीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी 4.3 कोटी रुपये शेअर बाजारात, तर 3.81 कोटी रुपये म्युच्युअर फंडमध्ये गुंतवले आहेत.

Rahul Gandhi यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे सर्वात जास्त शेअर्स सुप्रजीत इंजिनिअरिंग लि. या कंपनी आहेत. राहुल गांधी यांच्याकडे सुप्रजीत इंजिनिअरिंग लि. या कंपनीने 16 लाख 65 हजारांचे 4 हजार 68 शेअर्स आहेत. यासह आयटीसी, नेसले, पीडीलाईट, आयसीआयसीआय बँक, ब्रिटानिया इंडस्ट्री आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचेही शेअर्स आहेत.

राहुल यांच्या पोर्टफोलिओतील नामांकित शेअर्स –

Pidilite Industries – 42 लाख 27 हजारांचे 1 हजार 474 शेअर्स
Bajaj Finance – 35 लाख 89 हजारांचे 551 शेअर्स
Nestle India – 35 लाख 67 हजारांचे 1 हजार 370 शेअर्स
Asian Paints – 35 लाख 29 हजारांचे 1 हजार 231 शेअर्स
Titan Company – 32 लाख 59 हजारांचे 897 शेअर्स
Hindustan Unilever – 27 लाख 2 हजारांचे 1 हजार 161 शेअर्स
ICICI Bank – 24 लाख 83 हजारांचे 2 हजार 299 शेअर्स
Divis Laboratories – 19 लाख 7 हजारांचे 567 शेअर्स
Suprajit Engineering – 16 लाख 65 हजारांचे 4 हजार 68 शेअर्स
Garware Techno Fibers – 16 लाख 43 हजारांचे 508 शेअर्स
ITC ltd – 12 लाख 96 हजारांचे 3 हजार 93 शेअर्स

शेअर्ससह राहुल गांधी यांनी 3.81 कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्येही गुंतवले आहेत. त्यांनी HDFC MCOP DP GR मध्ये 19 लाख 58 हजार रुपये, HDFC Small Cap DP GR मध्ये 17 लाख 89 हजार रुपये, ICICI EQ&DF F Growth मध्ये 19 लाख 3 हजार रुपये, PPFAS FCF D Growth मध्ये 19 लाख 76 हजार रुपये, HDFC Small Cap Reg-G मध्ये 1 कोटी 23 लाख 85 हजार रुपये, HDFC Hybrid Debt Fund-G मध्ये 79 लाख रुपये आणि ICICI Prudential Reg Saving-G मध्ये 1 कोटी 2 लाख 19 हजार रुपये गुंतवले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडे 55 हजारांची रोकड असून त्यांच्या बँक खात्यात 26 लाख 25 हजार आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षातील त्यांचे उत्पन्न 1 कोटी 20 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे 15 लाख 2 हजारांचे गोल्ड बॉण्ड आहेत. तसेच राष्ट्रीय बचत योजना (नॅशनल सेविंग्ज स्किम), पोस्ट खात्यात बचत, इन्शुरन्स पॉलिसि आणि इतर मिळून 61 लाख 52 हजार रुपये गुंतविले आहेत.