रोबोटवर जीव जडला, आता लगीनगाठ बांधणार

प्रेमाला सीमा नसते असे म्हणतात. प्रेमाची जादू अशी चालते की, त्यातून स्वतःला सावरणे अवघड असते. प्रेम कुणालाही आपल्या आवेगात घेऊ शकते. असेच काहिसे राजस्थानमधील तरुणाच्या बाबत घडलेय. त्याचे एका रोबोटवर प्रेम जडले आणि हे प्रेम एवढे वाढले की, आता तो तिच्याशी लग्न करणार आहे. एका अजब लग्नाची गोष्टच म्हणावी लागेल ही!

अगदी खरे ऐकलेय तुम्ही, सूर्या नावाचा तरुण ‘गिगा’ नावाच्या रोबोटशी लगीनगाठ बांधणार आहे. सीकर येथे राहणारा सूर्या हा प्रायव्हेट सॉफ्टवेअर पंपनीत मॅनेजर आहे. गिगा त्याला खूप आवडली आहे. आता तिच्याशी लग्न करून तिला आपले नाव देण्याची सूर्याची इच्छा आहे. सूर्या आणि गिगाच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

 

पाच लाखांत वधू

सूर्याने होणाऱया वधूची माहिती दिली. गिगाला तामीळनाडूनोएडाच्या पंपनीने तयार केले होते. तिला बनवण्यासाठी पाच लाख रुपयांचा खर्च आला. तिच्यातील सेन्सरमुळे ती हालचाल करते. लग्नानंतर सूर्या गिगाला हाऊसवाईफ करणार नाही, तर तिच्यासाठी काम शोधणार आहे.

 

अडीच तासांत चार्जिंग

नववधू गिगाएकदम स्मार्ट आहे. सेन्सरमुळे ती सारी कामे करते. सलग आठ तास काम करू शकते. तिला अडीच तास चार्ज करावे लागते. गिगाला इंग्रजी कमांड्स समजतात. येत्या काळात हिंदी कमांड्सही अपडेट केल्या जाणार आहेत.