मावळमध्ये एकच हवा, खासदार नवा! संजोग वाघेरे यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद

 

मावळमध्ये आता एकच हवा, खासदार नवा हवा अशा उत्स्फूर्त घोषणांनी उरण शहर दणाणून गेले. शिवसेना महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी आजपासून उरण परिसरात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू केला. जासई येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून त्यांचा प्रचार दौरा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्या प्रचार रॅलीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मिंधेंच्या गोटात पळापळ उडाली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या गावनिहाय प्रचार दौऱ्यात मावळमध्ये आता एकच हवा, खासदार हवा नवा अशा उत्स्फूर्त घोषणा देत प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी दहा वर्षांच्या खासदारकीच्या कारकीर्दीत जनतेला आश्वासनाशिवाय काहीएक न देणाऱ्या गद्दारांना खरी शिवसेना कोणती हे जनताच दाखवून देईल. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबांचे नाव देणार असल्याची ग्वाही संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.

याप्रसंगी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जेएनपीएचे कामगार ट्रस्र्टी दिनेश पाटील, नरेश रहाळकर, विनोद म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी अध्यक्ष आर. सी. घरत, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शरद पवार गटाचे प्रशांत पाटील, भावना घाणेकर, मनोज भगत, शेकापचे प्रीतम म्हात्रे, संतोष घरत, रमाकांत म्हात्रे, सीमा घरत, माकपचे भूषण पाटील, रामचंद्र म्हात्रे, हेमलता पाटील, अॅड. विजय पाटील उपस्थित होते.