Astrology । Horoscope । 24 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – शुक्रवारी रेवती नक्षत्र संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे. तसेच सिद्धी, व्यतिपात आणि वरियान योग आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी आहे. प्रदोष आणि चार्तुमास्य समाप्ती आहे. तुलसी विवाहारंभ होत आहे. पंचागानुसार आज सकाळी 9.04 वाजेपर्यंत शुभ दिवस आहे. आज मेष, मिथुन, कर्क, सिंह, धनू आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – दुपारी 10.30 ते दुपारी 12.00वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानातून प्रथम स्थानात होत असल्याने आर्थिक समस्या संपण्याचे योग आहेत. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. त्यामुळे मनशांती मिळेल. घरातील वडिलधाऱ्यांचा सन्मान ठेवा. कोणत्याही कारणासाठी वादविवादात अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला फायद्याचा ठरेल. प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांच्यासह बाहेर फिरण्याचा बेत आखू शकता. त्यामुळे घरातील वातावावरण खेळीमेळीचे राहील.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानातून व्यय स्थानात होत असल्याने आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करावे लागेल. कार्यक्षेत्रात सहकारी मदत करतील. त्यामुळे उत्साह वाढलेला असेल. अचानक धनलाभाचे योग असले तरी खर्चाचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. अनेक दिवसांपासून ऱखडेलेली कामे मार्गी लागणार आहेत. मात्र, आजच्या दिवशी आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस सकारात्मक असेल. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानातून एकादश स्थानात होणार असल्याने कार्यक्षेत्रात केलेल्या कामांमुळे लाभ होणार आहे. त्यामुळे कामाचा व्याप वाढणार आहे. त्यातून कुटुंबासाठीही वेळ काढावा लागेल. त्यामुळे मानसीक दडपण वाढणार आहे. आज लाभाचे योग असले तरी व्यापार आणि व्यवसायात सावध राहावे लागणार आहे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातही कामे झपाट्याने पूर्ण करावी लागणार आहेत. कुटुंबासाठी वेळ काढल्यास घरातील वातावरण समाधानाचे राहणार आहे.

कर्क
कर्क राशीला आज नशीबाची साथ मिळणार आहे. चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून कर्म स्थानात होत असल्याने नशिबाला कर्माची जोड मिळणार आहे. व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस लाभाचा ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कार्यक्षेत्रात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. अभ्यासाचे नियोजन करत योग्य प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळणार आहे.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस दुपारनंतर चांगला असेल. चंद्राचे भ्रमण आठव्या स्थानातून भाग्य स्थानात होत असल्याने नशिबाची साथ मिळणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे दुपारनंतर करावी. व्यापाऱ्यांनी दुपारनंतरच महत्त्वाचे करार करावेत. तसेच भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी भागीदाराला शक्य ती मदत करावी, त्यामुळे फायदा होईल आणि भागीदाराच्या मदतीने कामे सहज पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानातून अष्टम होणार असल्याने आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना अनेक चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. मात्र, मनाची द्विधा मनस्थिती असल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात मुलांच्या भवितव्याच्या महत्त्वाचा विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातही कामाचा व्याप वाढणार असल्याने अस्वस्थता जाणवणार आहे.

तूळ
तूळ राशीला आज प्रत्येक कामात दक्ष राहवे लागणार आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानातून सप्तम स्थानात होत असल्याने दुपारनंतरचा दिवस चांगला असेल. कामाचा व्याप वाढला तरी सहकारी आणि जोडीदाराची साथ मिळणार आहे. मात्र, विनाकारण दगदग, धावपळ केल्यास मनस्ताप वाढणार आहे. एखाद्या गोष्टीवरून मनात चलबिचल राहील.अनेक दिवस रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कामात चालढकल करू नका, अन्यथा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेतल्यास अडचणीतून मार्ग सापडणार आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. चंद्राचे भ्रमण पचंम स्थानातून षष्ठ स्थानात होत असल्याने महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत, अन्यथा ती रेंगाळण्याची शक्यता आहे. नातेवाईकांकडून शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे मन आनंदी होणार आहे. मात्र, आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि पथ्य पाणी सांभाळण्याची गरज आहे. व्यापारात आणि कार्यक्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच सहकाऱ्यांची कामात चांगली मदत होणार आहे.

धनू
धनू राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानातून पंचम स्थानात होत असल्याने कुटुंबियांसह वेळ घालवता येईल. मुलांसाठी वेळ काढता येईल. त्यामुळे मुलांचा आनंद वाढणार आहे. त्यामुळे घरातही खेळीमेळीचे वातावरण असेल. दिवासाची सुरुवात चांगली झाल्याने तुम्ही दिवसभर आनंदात असाल. घरातील कामे वाढल्याने तुमचा व्यापही वाढणार आहे. मात्र, कुटुंबियांच्या मदतीने सर्व कामे वेळेत पूर्ण होणार आहेत.

मकर
मकर राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात होत असल्याने सामाजिक कार्यात असलेल्यांना मानसन्मान मिळण्याचे योग आहेत. मात्र, घरातील कामांचा व्याप वाढणार आहे. मात्र, आज उत्साह असल्याने कामाचा ताण जाणवणार नाही. तसेच आरोग्याचीही चांगली साथ मिळणार आहे. पण त्यामुळे पथ्य पाण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुटुंबाबत महत्त्वाचे निर्णय घेतल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस आनंदाचा असेल. चंद्र द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात भ्रमण करत असल्याने मनावरील दडपण कमी झाल्यासारखे वाटेल. तसेच अचानक लाभाचे योगही आहेत. कुटुंबासोबत लहान पिकनिकचा बेत ठरू शकतो. कार्यक्षेत्रात आणि व्यापारात हळूहळू सर्व कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मनावरील दडपण कमी होणार आहे. मात्र, आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. अन्यथा होत असलेली कामे रखडण्याची शक्यता आहे.

मीन
मीन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानातून द्वितीय स्थानात होत असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. तसेच अनेक योजना दृष्टीपथात येतील. तसेच एखादे नवे काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. व्यापारी व्यवसाय वाढीसाठी एखादी नवी योजना आखू शकतात. त्याचा चांगला फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रात कामे हातावेगळी करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनाही आज अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. घरातील वातावणाही आनंदी राहणार आहे.