विभाग क्र. 4, 5 आणि चांदिवली विधानसभेतील शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर   

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 4, 5 आणि चांदिवली विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱयांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

वांद्रे पूर्व विधानसभा विधानसभा समन्वयक – चंद्रशेखर वायंगणकर, हरि शास्त्री, उपविभागप्रमुख – उदय दळवी (शाखा क्र. 95, 96), शाखाप्रमुख – अरुण कांबळे (शाखा क्र. 93), वसंत गावडे (शाखा क्र. 95).

विलेपार्ले विधानसभा विधानसभा संघटक – संदीप नाईक,  शाखाप्रमुख – चारुदत्त पाटील (शाखा क्र. 82), सुनील आडेलकर (शाखा क्र. 83).

अंधेरी पूर्व विधानसभा उपविभागप्रमुख – अनिल खांडेकर (शाखा क्र. 83, 84 अंधेरी विधानसभा), प्रताप मुळीक (शाखा क्र. 72, 79), अरविंद शिंदे (शाखा क्र. 86, 121), उपविभाग समन्वयक – राजेंद्र सातर्डेकर, शाखाप्रमुख – अनंत भुते (शाखा क्र. 79, अंधेरी विधानसभा), शाम सावंत (शाखा क्र. 121).

चांदिवली विधानसभा विधानसभा संघटक – विजयेंद्र शिंदे, विधानसभा समन्वयक –  ईश्वर तायडे, उपविभागप्रमुख – संतोष कासले (शाखा क्र. 156, 157, 158), उपविभाग समन्वयक – राजू पाखरे (शाखा क्र. 159, 160, 161), शाखाप्रमुख – सनी आचरेकर (शाखा क्र. 156), हिरालाल यादव (शाखा क्र. 158).