सोपोरमध्ये दोन दहशतवादी उडवले

सुरक्षा दलांनी शुक्रवारी सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना खलास केले. गुरुवारपासून ही कारवाई सुरू होती. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. या वेळी एका नागरिकाच्या खांद्याला गोळी लागली. नौपोरा भागातील एका घरात हे दहशतवादी लपले होते. सुरक्षा दलांनी तेथे नाकाबंदी केल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथे चकमक सुरू झाली. गुरुवारी रात्री अंधार पडल्याने थांबवलेली ही कारवाई आज सकाळी पुन्हा सुरू झाली. ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.

याआधी मंगळवारी बांदिपोरा येथील रेनजी अरागम येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवानही जखमी झाले होते.