विभाग क्र. 10 मधील  शिवसेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र.10 मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

  निरीक्षक – प्रकाश आचरेकर (धारावी विधानसभा), उपविभागप्रमुख – गणेश खाडये (शाखा क्र. 183, 185), उपविभाग समन्वयक – राजू कांबळे (शाखा क्र. 184, 186), विधानसभा संघटक – मुपुंद पडय़ाळ  ( वडाळा विधानसभा – विशेष संलग्न शाखा), विधानसभा उपक्षेत्रप्रमुख – विलास राणे (वडाळा विधानसभा शाखा क्र. 177, 178, 200, 201), सहनिरीक्षक – सुरेश काळे (वडाळा विधानसभा – नायगाव), विश्वास निमकर (वडाळा विधानसभा माटुंगा पूर्व), समन्वयक – दत्ता घाटकर (वडाळा विधानसभा शाखा क्र. 177, 178), सुनील भूमकर (वडाळा विधानसभा शाखा क्र. 200, 201), उपविभागप्रमुख – नितीन पेडणेकर (वडाळा विधानसभा – शाखा क्र. 177, 200), शाखाप्रमुख – अभिषेक सावंत (शाखा क्र. 200).